फलटण टुडे(फलटण) : –
छञपती शिवाजी महाराज क्रीडा विद्यापीठ बालेवाडी, पुणे या ठिकाणी दि. २८ ते ३१ जानेवारी २०२३ या कालावधीत झालेल्या राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत मुधोजी कनिष्ठ महाविद्यालय,फलटणच्या खेळाडूंनी अंतिम फेरीत राज्यात चौथा क्रमांक मिळविला. यामधे 19 वर्षांखालील मुले ४*४०० मी. रिले धावणे या प्रकारातील खेळाडू खालीलप्रमाणे
१) *कु. बापुराव तरडे* – (एन.सी.सी.कँडेटस )
२) *कु.गणेश काशिद*
(एन.सी.सी.कँडेटस )
३) *कु.ओमकार नरळे*
(एन.सी.सी.कँडेटस )
४) *कु.शिवा कर्णे*
(एन.सी.सी.कँडेटस )
५) *कु. रुतिक गवळी*
(एन.सी.सी.कँडेटस )
या खेळाडूंचा समावेश होता.
या यशस्वी खेळाडूंना फ.ए.सो.फलटण चे मैदानी खेळाचे मार्गदर्शक श्री . राज जाधव ,प्रशालेचे क्रीडा शिक्षक प्रा. तायाप्पा शेंडगे , यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी खेळाडूंचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे मा. सभापती नामदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फ. ए. सोसायटीचे चेअरमन माननीय श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर, फ. ए. सोसायटीचे सेक्रेटरी माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फ.ए.सो.फलटण क्रीडा समितीचे अध्यक्ष श्री .शिवाजीराव घोरपडे ,प्रशासन अधिकारी मा. श्री . अरविंद निकम, अधीक्षक मा. श्री. श्रीकांत फडतरे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.पी.एच. कदम, उपप्राचार्य वरिष्ठ विभाग डाँ. संजय दिक्षित, कनिष्ठ विभाग उपप्राचार्य प्रा.एस.आर. वेदपाठक, क्रीडा समितीचे सचिव श्री. सचिन धुमाळ, श्री.महादेव माने व क्रीडा समिती सर्व सदस्य आणि सर्व सहकारी प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.