राज्यस्तरीय आंतरशालेय नृत्य स्पर्धेत आकाश कला अकादमी फलटणच्या कु.पलक मेहताने पटकाविला प्रथम क्रमांक

 कु.पलक  मेहता हिचे अभिनंदन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व इतर मान्यवर

फलटण टुडे ( पूणे ) :-

पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या नृत्य मल्हार राज्यस्तरीय आंतरशालेय नृत्य स्पर्धा २०२२-२३ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .

नृत्य मल्हार राज्यस्तरीय आंतरशालेय नृत्य स्पर्धेतील लोकनृत्य या नृत्य स्पर्धेमध्ये लहान वयोगटात फलटण येथील आकाश कला अकादमीच्या कु. पलक रोहन मेहता हीने प्रथम क्रमांक पटकाविला .

या यशाबद्दल कु. पलक रोहन मेहता व तिला मार्गदर्शन करणारे राजेंद्र संकपाळ व हर्षल कदम यांचे महाराष्ट्र ॲम्युच्अर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा सातारा जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!