फलटण टुडे (सातारा, दि. 9 ):
औद्योगिक क्षेत्रातील उद्योगधंदे अधिक वृध्दींगत व्हावे व औद्योगिक क्षेत्र अधिक विकसीत व्हावे या शासनाच्या धोरणानुसार पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी शिवतेज हॉल येथे बैठक घेतली.
या बैठकीला अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्र यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी सातारा, कराड, फलटण, लोणंद, शिरवळ, खंडाळा, तळबीड, कारेगाव या विविध ठिकाणचे औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक यांनी विविध समस्या मांडल्या. मांडलेल्या सर्व समस्या पोलीस विभागाकडून सोडविल्या जातील, असे पोलीस अधीक्षक श्री. शेख यांनी बैठकीत सांगितले.