फलटण टुडे ( फलटण ) : –
मंगळवार दि. ०७ फेब्रुवारी २०२३ रोजी फ. ए. सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालय फलटण येथे तत्त्वज्ञान विभागाच्यावतीने मोफत समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले असुन समुपदेशन केंद्राचे उद्घाटन प्रसिद्ध मनोविकार तज्ञ आणि मानसोपचार तज्ञ मा. डॉ. राजश्री नाळे यांच्या शुभहस्ते झाले.
तसेच मुधोजी महाविद्यालयच्या तत्त्वज्ञान विभागांतर्गत समुपदेशन केंद्राच्या वतीने फलटण येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ मा. डॉ. राजश्री नाळे यांनी ‘परीक्षांना सामोरे जाताना’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले , यावेळी आपल्या अनुभव आणि अभ्यास याच्या माध्यमातून मुलांना परीक्षांना सहज कसे सामोरे जाता येईल, एवढेच नव्हे तर जीवनातील विविध संकटांना प्रसंगांना कशा पद्धतीने तोंड देता येईल याविषयी मार्गदर्शन केले, ताणविरहित जीवन कसे जगता येईल याविषयी सांगून त्यांनी प्राण हीलिंग, सहज सुलभ असे योगातील काही प्रकार, प्राणायाम याविषयी सुंदर असे मार्गदर्शन केले
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. पंढरीनाथ कदम हे होते त्यांनीही विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले शाळा कॉलेजमधील परीक्षा हीच केवळ परीक्षा असे नसून आपले जीवन हीच एक परीक्षा आहे या दृष्टीने विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल करावी असे सांगितले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख मा. डॉ. नवनाथ रासकर यांनी केले,आभार प्रा. स्वरूप अहिवळे यांनी मांनले, सूत्रसंचालन प्रा. सचिन कदम यांनी केले यावेळी सकाळ विभाग प्रमुख मा. प्रा. डॉ प्रभाकर पवार, IQAC समन्वयक मा. प्रा. डॉ. टी. पी. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच विभागातील सर्व सहकारी आणि महाविद्यालयातील विविध विषयाचे विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.