लिनेस क्लब ऑफ बारामतीचा शपथविधी सोहळा संपन्न

 आरोग्यासाठी प्लॅस्टिक टाळून वसुंधरा हरित ठेवण्याची शपथ घेऊन संपन्न…

लिनेस क्लब ऑफ बारामतीच्या शपथविधी सोहळा प्रसंगी उपस्तीत महिला 
फलटण टुडे (बारामती ): 
              
 लिनेस क्लब ऑफ बारामतीच्या अध्यक्षपदी लि. मृदुला मोता , सचिवपदी लि. शुभांगी चौधर, खजिनदारपदी लि. संगिता मेहता आणि संचालक मंडळाचा लि. पास्ट मल्टिपल प्रेसिडेंट नलिनीजी पारेख यांच्या हस्ते शपथ व पद‌ग्रहण समारंभ उत्साहात संपन्न झाला.
       पूर्व अध्यक्ष लि. सुमन जाचक यांच्या कडुन मृदुला मोता यांनी अध्यक्षपदाची व इतर सहकाऱ्यांनी सूत्रे हातात घेऊन,आरोग्यासाठी पिडित महिला सबलीकरणासाठी समाजातील गरजु विद्यार्थ्यांसाठी, वृध्दांसाठी कार्य करण्याचे सांगून आपले आरोग्य सुंदर राहण्यासाठी प्लॅस्टिक टाळून पर्यावरण, वसुंधरा हरित ठेवण्याची शपथ घेऊन सर्वांना शपथ देऊन सेवाकार्याची सुरुवात केली.
       यावेळी मल्टिपल पास्ट प्रेसिडेंट लि. विद्याजी पाच्छापूरकर , बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांचे सेवाकार्यासाठी मार्गदर्शन लाभले.
      यावेळी बारामतीमधील सर्व लिनेस पदाधिकारी व सभासद, भगिनी मंडळ, जैन श्राविका मंडळ, जिजाऊ सेवा संघ, विद्या प्रतिष्ठान,सहयोग सोसायटी अध्यक्ष व पदाधिकारी, तसेच दिव्यध्वनी एम एच ४२ च्या बारामती रिजन को ऑर्डीनेटर,लि.किर्ती पहाडे व कोल्हापुर रिजन को ऑर्डीनेटर लि. रजनी नांगरे यांच्या उपस्थितीत पार पडला.            
      सूत्रसंचालन लि. धनश्री गांधी व गीतांजली जाचक आणि आभार प्रदर्शन शुभांगी चौधर यांनी केले.


 
—————————–
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!