फलटण टुडे (बारामती ):
डिजिटल युगात मोबाईल पेक्षा
बालवयात कड,किल्ले यांचे संवर्धन व संरक्षण करीत खऱ्या इतिहासाची ओळख पुढील पिढी ला होणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन इतिहास संशोधक, अभ्यासक ,व्याख्याते पत्रकार दत्ताजी नलावडे यांनी केले.
बारामती तालुका मावळा जवान संघटना यांच्या वतीने
ऐतिहासिक विचाधारनेतुन विचारमंथन व्याख्यान व सुभेदार नरविर तानाजी मालुसरे यांचा पुण्यदिन निमित्त गड किल्ले उभारणी, निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा मधील सहभागी व विजेत्यांचा सन्मान प्रसंगी दत्ताजी नलवडे बोलत होते .
या प्रसंगी बारामती तालुका मावळा जवान संघटना अध्यक्ष प्रदीप ढुके
रोहित नलावडे, दत्ताजी महाले सपकाळ ( शूर शिवरक्षक जिवाजी महाले यांचे 11 वे वंशज ) नगरपरिषद चे मुख्याधिकारी महेश रोकडे साहेब , मराठा महासंघाच्या अध्यक्षा अर्चना सातव अध्यक्ष ,सौ अर्चना ढुके ,मंगल बोरावके,ज्योतीताई जाधव, माधव जोशी , प्रभाकर बनकर , चारुदत्त काळे, अमोल यादव, प्रमोद बगाडे, गोकुळ टंकसाळे , योगेश नालंदे ,मधुकर बनसोडे, महेश नाळे, शेखर जाधव, प्रकाश सातव , राम गवळी, नितीन मांडगे, मिनिनाथ मोरे, आबासाहेब सूर्यवंशी, धीरज पवार, रमेश मरळ देशमुख , दत्तात्रय हरिहर ऊपस्थित होते.
गड किल्ले संदर्भात सर्वच शासनाकडून अपेक्षा करण्या पेक्षा सामाजिक बांधिलकी जपत शक्य होईल त्या ठिकाणी प्रशिक्षण घ्या, बालवयात संस्कार करा, परदेशात पर्यटन करण्यापेक्षा देशातील विविध गड किल्ले पहा, इतिहास समजून घ्या
असाही सल्ला दत्ताजी नलवडे यांनी उपस्तीत यांना सल्ला दिला.
वेळी प्रदिप ढुके यांचा मुलगा जन्मेजयराजे याच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबविल्या बदल ढुके परिवाराचा
मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
प्रदीप ढुके यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन अश्विनीकुमार पत्की यांनी केले.
विविध स्पर्धेमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.