मुधोजी हायस्कूल मधे 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात व विविध रंगारंग कार्यक्रमाने साजरा

फलटण टुडे (फलटण) :-
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज , फलटण येथे 26 जानेवारी 2023 रोजी 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात व विविध रंगारंग कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.

प्रथम मुधोजीराजे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून ध्वजारोहण फलटण एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अशोक जीवराज दोशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण राष्ट्रगान अभियांतर्गत राष्ट्रगीत नेरकर ए एस व लोणकर बी जे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी गायले व कार्यक्रमाची सुरुवात झाली.

तसेच एन सी सी च्या विद्यार्थ्यांनी पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी परेड सादर केली व मानवंदना दिली .

 यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून या विद्यालयाच्या माजी जेष्ठ विद्यार्थीनीं निलीमा हेमंत दाते या उपस्थित होत्या. तसेच यावेळी गव्हर्निंग कौन्सिल चे सदस्य भोजराज नाईक निंबाळकर , शिवाजीराव घोरपडे , हेमंत वसंतराव रानडे , शिरीषकुमार दोशी , माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर , माजी नगरसेविका सुवर्णा अमरसिंह खानविलकर , बी आर सी च्या समन्वयक कुंभार मॅडम , माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर , प्रशासन अधिकारी अरविंद निकम , अधिक्षक श्रीकांत फडतरे , तपसणी अधिकारी दिलीप राजगुडा , प्राचार्य बाबासाहेब गंगवणे , उपप्राचार्य एम के . फडतरे , ए वय ननवरे , पर्यवेक्षक शिवाजीराव काळे, फलटण एज्युकेशन सोसायटीचे इतर सदस्य शाळा व्यवस्थापन समिती सदस्य विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.
पुढील कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील विविध शिष्यवृत्ती परीक्षेत विविध क्रीडा स्पर्धेत तसेच १० वी १२ वी च्या आर्ट्स , कॉमर्स व सायन्स या मध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले . 

यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम लेझीम नृत्याने सुरुवात झाली व पुढे देशभक्तीपर अनेक गाण्यावर नृत्य सादरीकरण केले व प्रेक्षकांची दाद मिळवीली . अशा प्रकारे ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या रंगरंग कार्यक्रमाची सांगता झाली.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!