फलटण टुडे (सातारा ) दि. 3 :
भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग यांच्यावतीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर सहा पदरीकरण प्रकल्पाचे काम सुरु असुन कराड व मलकापूर ता. कराड या दरम्यान असलेला उड्डाणपुल काढुन टाकण्यात येणार आहे. यासाठी वाहतुकीत बदल करुन अंतर्गत वाहतुक व्यवस्था सुरळीत राहण्याकरीता पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 34 अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये दि. 5 फेब्रुवारी 2023 चे ००.०१ वा. पासुन पुढील आदेश होईपर्यंत खालील वाहतुक मार्गात बदल केला आहे.
कोल्हापुर कडुन सातारा बाजुकडे जाणारी वाहतुक ढेबेवाडी फाटयावरील ओव्हरब्रिज कराड बाजुस ज्या ठिकाणी संपतो तेथे पश्चिमेकडील सेवारस्त्यावर वळविण्यात येणार आहे.
कोल्हापुरहुन कराडमध्ये येणारी वाहने हि एकेरी वाहतुकीने वारुंजी फाटा पर्यंत येतील तेथुन पुढे जड वाहतुक ही वारुंजी फाटा येथुन हॉटेल पंकज समोरुन सेवारस्त्यामार्ग महात्मा गांधी पुतळयासमोरुन कराडमध्ये जाईल. हलकी वाहतुक ही वारुंजी फाटा येथुन जुना कोयना ब्रिज मार्गे कराडमध्ये जाईल.
कराड शहरा मधुन कोल्हापुर नाका येथे बाहेर पडणाऱ्या वाहनासाठी ) कोल्हापुर बाजुकडे जाण्यासाठी सेवारस्ता मार्गाचा वापर करुन जाता येईल. कराडमधुन सातारा कडे जाणारी वाहने भादी हार्डवेअर समोरुन उजवीकडे यु-टर्न घेवुन नंतर इंडिअन ऑइल पेट्रोलपंपाजवळ सर्विसरोडला मिळणार आहेत.
सातारा ते कोल्हापुरकडे जाणारी वाहतुक हॉटेल पंकज समोरुन पश्चिमेकडील कोल्हापुर सातारा लेनवर वळविण्यात येईल व कोल्हापुर नाक्यावरील ब्रिज संपलेनंतर पुर्वेकडील सेवारस्त्यावर एकेरी मार्गाने घेण्यात येईल कृष्णा हॉस्पिटल समोरील ब्रिजसंपल्या नंतर गंधर्व हॉटेलजवळ वाहतुक पुर्ववत महामार्गावर घेण्यात येईल.
सातारा कडुन कोल्हापुरकडे (वारुंजी फाटा ते गंधर्व हॉटेल) व कोल्हापुर कडुन साताराकडे (कोयना वसाहत ते वारुंजी फाटा) जाणारी वाहतुक हि एकेरी वाहतुक असल्याने विरुद्ध दिशेने वाहने चालविण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच सदर मार्गावर कोणत्याही प्रकारची वाहने पार्किंग करण्यास मनाई करण्यात येत आहे.
कराड बाजुकडुन ढेबेवाडीकडे जाणारी वाहतुक हि कोल्हापुर नाका ते ढेबेवाडी फाटा पर्यंत एकेरी मार्गाने ढेबेवाडी फाटापर्यंत जावुन ब्रिज खालुन ढेबेवाडीकडे जाईल.
ढेबेवाडी बाजुकडुन कराड शहराकडे येणारी वाहतुक हि ढेबेवाडी फाटा येथुन पश्चिमेकडील
सेवारस्त्याने वारुंजी फाटा मार्गे कराडमध्ये येईल.
जड वाहतुक (ओडीसी वाहने) हि फक्त रात्रीच्या वेळी वाहतुकीस परवानगी देण्याचे नियोजन
करण्यात आले आहे.
कोल्हापुर नाका ते पंकज हॉटेल यामार्गावर असणारा भुयारी मार्ग बंद राहील.
तरी कराड मधील वाहतुक मार्गातील बदलासाठी सर्व नागरीकांनी नोंद घेवून पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. शेख यांनी केले.