माणगंगा साहित्य परिषद पांगरी व साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन फलटण जिल्हा सातारा यांचे संयुक्त विद्यमाने प्रकाशित पुस्तके 2022-23 माणगंगा साहित्यप्रेमी गौरव पुरस्कारासाठी मागविण्यात आली होती. राज्यभरातून 158 साहित्यिकांची विविध वाङ्मयीन प्रकाराची प्रकाशित पुस्तके प्राप्त झाली होती त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती माणगंगा साहित्य परिषद पांगरी व साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन फलटणचे अध्यक्ष व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी दिली. 1)व्यक्तिचित्रण- प्रबोधनाचा वसा आणि वारसा-प्रिं.डॉ. शिवलिंग मेनकुदळे 2) ललित लेख- पाय आणि वाटा- सचिन पाटील 3)कादंबरी- हेळसांड- डॉ बाळासाहेब शिंदे 4) संपादित शोधनिबंध- नव्वदोत्तरी मराठी साहित्यातील विविध प्रवाह- डॉ सविता व्हटकर 5) समीक्षा संपादित- बाबूराव गायकवाड यांचे कथालेखन- डॉ कमल दणाणे 6) प्रवासवर्णन- महाराष्ट्राचे चारधाम व इतर यात्रा- सौ.सुधा लोंढे 7) वात्रटिका- पटावरची प्यादी – प्रा.शिवाजी वरुडे 8) कथासंग्रह- जाणीव- प्रा. नंदकुमार शेडगे व
बाईपणाच्या उंबरठ्यावर- सौ मनाली बावधनकर 9) संदर्भग्रंथ – आदिवासी साहित्य, कादंबरी आणि स्त्री-प्रा. डॉ. मुक्ता आंभेरे 10) आत्मचरित्र- नेत्र संजीवनी- डॉ सुधीर बोकील 11) चारोळी संग्रह- हृदयस्पर्शी अक्षरवेल – सविता गोलेकर 12) चरित्र- रयतधारा- प्रा अरुण घोडके 13) गझलसंग्रह – आयुष्य पेलताना- प्रसन्नकुमार धुमाळ 14) संपादित काव्यसंग्रह- पेरणी- संपादक परशुराम लडकत 15) काव्यसंग्रह- अंतस्थ हुंकार- डॉ. शिवाजी शिंदे , मी भारतीय – डॉ सुभाष वाघमारे अश्वस्थ- वर्षा वराडे
नाही उमगत ती अजूनही- डॉ सोनिया कस्तुरे ,आई- हेमा पवार- जाधव तसेच साहित्यिक क्षेत्रात भरीव योगदान देणार्या ज्येष्ठ साहित्यिकांना
‘ विशेष माणगंगा साहित्यप्रेमी पुरस्कार ‘ देऊन गौरविण्यात येणार आहे यामध्ये 1)एम. के. भोसले – बिजवडी 2) गंगाराम कुचेकर – पुणे 3) आनंदा ननावरे- सातारा 4) सौ जयश्री माजगावकर- मेढा अशा पुरस्कारप्राप्त सर्व साहित्यिकांचे अभिनंदन करण्यात आले असून फलटण येथे फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या चौथ्या युवा स्पंदन साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व पुस्तके भेट देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरस्कार योजनेतील सर्व सहभागी साहित्यिकांचे सहकार्यामुळे ही पुरस्कार स्पर्धा यशस्वी झाली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष युवा कवी अविनाश चव्हाण, समन्वयक प्रा.सौ सुरेखा आवळे, रानकवी राहुल निकम, सदस्य राजेश पाटोळे, दत्तात्रय खरात चैताली चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.