फलटण टुडे (सातारा )दि. 2 :
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास (पती-पत्नी आणि त्यांची 18 वर्षाखालील मुले) रु. 2000/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात रु. 6000/-प्रती वर्षी लाभ देण्यात येतो. माहे डिसेंबर 2022 ते मार्च 2023 कालावधीतील 13 व्या हप्त्यासाठी लाभार्थ्यांची बँक खाती आधार संलग्न करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार सातारा पोस्टल विभागात 54 हजार 601 लाभार्थींची बँक खाती प्रथम प्राधान्याने आधार संलग्न करणे आवश्यक आहे.
बँक खाती आधार संलग्न करण्यासाठी भारतीय डाक विभागामार्फत दि. 6 ते 8 फेब्रुवारी 2023 या कालावधीत मोहीम सुरु करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील गरजू लाभार्थी नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन सातारा विभागाचे प्रवर डाक अधिक्षक ए. व्यंकटेश्वर रेड्डी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक अधिक्षक डाकघर एस. एस. घोडके मो. नं. 8698578476 अथवा पंकज बेलोकर मो.नं. 8275342454 किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा.