फलटण टुडे ( सातारा )दि. 2 :
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सातारा यांच्यावतीने जिल्हास्तर एफ. सी. बायर्न महाराष्ट्र फूटबॉल कप क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. 8 ते 10 फेब्रुवारी 2023 या कालावधीत सैनिक स्कूल सातारा येथे करण्यात येणार आहे.
या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडूची जन्मतारिख 1.1.2009 नंतरची असावी. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज दि. 7 फेब्रुवारी 2023 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूल, सातारा येथे सादर करावे. तरी जास्तीत जास्त शाळा, क्लब यांनी स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी केले आहे.