महाविद्यालयांनी 6 फेब्रुवारी पर्यंत शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

फलटणा टुडे (सातारा ) दि. 2 : 
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनु. जाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी, राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व विद्यावेतन या योजनांचा लाभ देण्यात येतो. या सर्व योजना शासनामार्फत Mahadbtmahait.gov.in या प्रणालीवरुन ऑनलाईन राबविण्यात येत आहेत.

शैक्षणिक वर्ष सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाचे अर्ज भरण्यासाठी दिनांक 22 सप्टेंबर 2022 पासुन अर्ज स्वीकारण्यास व मंजुरी करण्यास सुरुवात झालेली आहे. सातारा जिल्ह्यातील अनु. जाती प्रवर्गातील पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे 100 टक्के अर्ज भरुन शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे दि. 6 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन सादर करावेत, असे अवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण नितीन उबाळे यांनी महाविद्यालयांना केले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!