'खेलो इंडिया' साठी महाराष्ट्र प्रमुख प्रशिक्षक पदी दादा आव्हाड ची निवड.

दादा आव्हाड

फलटण टुडे (बारामती ): 
05 फेब्रुवारी ते 09 फेब्रुवारी दरम्यान इंदोर ,मध्यप्रदेश येथे होणाऱ्या ५व्या खेलो इंडिया गेम्सचे आयोजन केंद्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात आले असून त्यासाठी दिनांक २० जानेवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधी मध्ये कब्बड्डी स्पर्धेसाठी पात्र खेळाडूंचे शिबीर बालेवाडी येथील शिवछत्रपती आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात आले असून या खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी बारामतीचा सुपुत्र प्रो कब्बड्डी खेळाडू, राष्ट्रीय पदक विजेता, एन.आय.एस कबड्डी कोच दादासो आव्हाड यांची खेलो इंडिया युथ गेम्समध्ये खेळणाऱ्या महाराष्ट्र कब्बड्डी संघाच्या प्रमुख प्रशिक्षक म्हणून नियुक्ती क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात आली आहे . 
दादासो आव्हाड हे गेली सात वर्षापासून बारामती व तालुक्यातील खेळाडूंना बारामती स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा संकुल बारामती येथे प्रशिक्षण देत आहेत तसेच या प्रशिक्षणातून बारामती मधील व परिसरातील 25 ते 30 मुले व मुली राष्ट्रीय राज्य स्तर व विद्यापीठ स्तरावर बारामतीचे नावलौकिक करत आहेत.
दादासो आव्हाड यांनी महाराष्ट्र संघाकडून स्पर्धेत सर्वोतम कामगिरी करू अशी ग्वाही दिली आहे त्यांची महाराष्ट्र संघाच्या प्रमुख प्रशिक्षक पदी बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क अध्यक्ष सौ सुनेत्रा पवार, विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील , जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे , तालुका क्रीडा अधिकारी अनिल सातव व महेश चावले व बारामती स्पोर्ट्स अकॅडमी मधील सर्व पदाधिकारी खेळाडू, बारामती मधील सर्व क्रीडा प्रेमींनी अभिनंदन केले.

 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!