शाळा कॉलेजमधून बाहेर पडणार प्रत्येक विद्यार्थी हा शाळेचा राजदूत : डॉ विवेक भोईटे

बारावी सदिच्छा समारंभ कार्यक्रमात बोलत डॉ विवेक भोईटे

इयत्ता बारावी सदिच्छा समारंभ कार्यक्रमात मागदर्शन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर


फलटण टुडे ( फलटण ) सुरेंद्र फाळके :

शाळा कॉलेजमधून बाहेर पडणार प्रत्येक विद्यार्थी हा शाळेचा राजदूत असतो तो जा ठिकाणी कार्यरत होईल त्या ठिकाणी स्वतःबरोबर कुटुंब व शाळेचे नाव मोठे करत असतो असे प्रतिपादन, डॉ विवेक भोईटे यांनी केले ते इयत्ता बारावी सदिच्छा समारंभ कार्यक्रमात बोलत होते.आपण ज्या शाळेत शिकत असतो,त्या शाळेतील शिक्षक आपल्यावरती संस्कार करत असतात.आपण कसे घडलो आयुष्यात आपण काय करणार आहोत.हे आपण इयत्ता अकरावी बारावीच्या वर्गात शिकत असताना ठरवत असतो.महाराष्ट्राचे पहिले कृषिभूषण श्री रामभाऊ भोईटे हे माझे आजोबा त्यांचे संस्कार माझ्यावरती व कुटुंबावरती झाले म्हणून पुढे जाऊन एम. एस. सी साठी (माती) हा विषय निवडला,14 फेब्रुवारी रोजी देशाचे पंतप्रधान” श्री नरेंद्रजी मोदी साहेब” यांनी केवीके भेट दिली व चर्चा झाल्यानंतर मी राबवलेल्या सॉईल हेल्थ कार्ड(soil health card) प्रबंधाचे संपूर्ण देशात राबवण्यात यावे अशा सूचना श्री मोदी साहेबांनी दिल्या त्याचबरोबर त्याचे संलग्न असलेल्या मोबाईल ॲप सुद्धा आम्ही तयार करून कार्य केले आहे.मालोजीराजे शेती विद्यालयातून बाहेर पडल्यावर ,मी परत या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून यावे लागेल हे स्वप्न सुद्धा वाटले नव्हते पण ते आज सत्य उतरत आहे ,यासाठी मी आभारी आहे.


भविष्याचा विचार करून स्वतःला झुकून दिले तरच यश प्राप्त होईल असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले, ते अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत होते.आपल्या महाविद्यातील विद्यार्थी हे शेती पासून सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत,तुम्हाला यश मिळालं तरच तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना मानसिक समाधान लाभेल.त्यामुळे इथून पुढचे आयुष्य हे निर्व्यसनी जगा ,
यावेळी अभिषेक भगत या विद्यार्थ्याने कविता सादर केली.त्याच कवितेचा धागा धरत संजीवराजे यांनी, श्री अरविंद निकम सरांचे कौतुक करत त्यांच्या कार्याचा आढावा घेतला.व इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील कार्यासाठी संस्थेच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

तत्पूर्वी प्रशाले चे प्राचार्य श्री ज्ञानदेव कोळेकर यांनी प्रास्ताविक केले ,तर श्री जाधव सर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.आजच्या सदिच्छा समारंभासाठी प्रशालेचे चेअरमन श्री शरद रणवरे, सदस्य ,श्री रामचंद्र निंबाळकर .श्री अरविंद निकम ,श्री बाबासाहेब खरात श्री उत्तमराव घोरपडे,सौ कविता सावंत,श्री श्रीकांत फरतडे,श्री मारुती दिवसे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.आशालाता काशीद व शिल्पा कदम/ इंगवले यांनी केले .
शिक्षक मनोगत श्री मारुती दिवसे यांनी केले तर, प्रशालाच्या प्राचार्य सौ पूनम कदम यांनी आभार मानले
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!