मुधोजीमध्ये इयत्ता १२ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी मागदर्शन व शुभेच्छा समारंभ पडला पार
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उपशिक्षणाधिकारी मा.रविंद्र खंदारे
फलटण टुडे (फलटण) दि. 30 :-
फलटण एज्युकेश सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे 30 जानेवारी 2023 रोजी मार्गदर्शक म्हणून सातारा जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी मा. रविंद्र खंदारे यांनी मुधोजी हायस्कूल मधील इयत्ता १२ वी च्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या . हा कार्यक्रम मुधोजी हायस्कूलच्या चित्रकला हॉल मधे पारपडला
यावेळी बोलतान सातारा जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी मा. रविंद्र खंदारे म्हणाले की येणाऱ्या १२ वीच्या बोर्ड परीक्षेसाठी सामोरे जाताना कोणतीही भिती किंवा न्युनगंड न बाळगता न घाबरता सामोरे गेले पाहिजे आताच्या घडीला बोर्ड परीक्षेत नापास होणे कठीन आहे तर पास होणे फार सोपे आहे . कारण तुम्हाला अंतर्गत मार्कस् मुळे पास होणे सोपे झाले आहे . अभ्यास करताना मनाची एकाग्रता म्हत्वाचीची आहे . त्यासाठी ध्यान धारना करणे म्हत्त्वाचे आहे . त्याबरोबर अभ्यासाचे नियोजन फार म्हत्त्वाचे आहे . हे सर्व करून स्वतःमधील क्षमता ओळखा व या परीक्षेस न भिता न डगमगता सामोरे जा असे सांगून विद्यार्थांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या .
या कार्यक्रमाचे प्रास्तावीक मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य बी.एम गंगवणे यांनी केले यावेळी बोलताना ते म्हणाले की जिद्द आणि चिकाटी याच्या जोरावरती आपण यश संपादन करू शकतो योग्य नियोजन ही यशाची गुरुकिल्ली आहे ती मिळविण्यासाठी कष्टाची तयारी हवी तर यश चालून अल्याशिवाय राहाणार नाही असे सांगितले .
यावेळी कार्यक्रमासाठी मधुजी हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे उपप्राचार्य एम के फडतरे ,माध्यमिकचे उपप्राचार्य ए वाय ननावरे ,पर्यवेक्षक शिवाजीराव काळे , ज्युनिअर कॉलेजचे शिक्षकवृंद इत्यादी मान्यवर उपस्थित होते .