फलटण टुडे ( जावली ) :-
मौजे जावली तालुका फलटण येथे दिनांक 22 ते 28 जानेवारी दरम्यान मुधोजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवशीय श्रम संस्कार शिबीर संपन्न झाले.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रेरणेने व श्रीमंत रघुनाथराजे तसेच श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षीच्या श्रामसंस्कार शिबिरासाठी जावली या गावाची निवड करण्यात आली.
जावली गावाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यावरणीय हब बनविण्याच्या उद्देशाने जावली येथे एकूण 14 लक्ष वृक्ष लागवड करण्याचा संकल्प यापूर्वीच श्रीमंत रामराजे यांनी केलेला आहे. त्याकामी खारीचा वाटा उचलण्याच्या दृष्टीने या शिबिराला महत्वाचे मानले जात आहे.
या शिबिरामध्ये कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे एकूण 130 स्वयंसेवक, स्वयंसेविका सहभागी झाले होते. सदर कालावधीत शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी गाव परिसर स्वच्छता, मंदिर परिसर स्वच्छता, वृक्ष लागवडी साठी खड्डे तयार करणे, आळी तयार करणे यासारखे उपक्रम राबवले. याचबरोबर दरदिवशी विविध तज्ञाची मार्गदर्शन पर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. यामध्ये उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर, प्रा. टी. पी. शिंदे, प्रा. पी. आर. पवार, डॉ. सुनीता निंबाळकर यांचा समावेश होता.
शिबिराची सांगता शनिवार दिनांक 28 जानेवारी रोजी झाली. या समारोपच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून फलटण खंडाळा मतदार संघांचे आमदार दीपक चव्हाण तर अध्यक्ष स्थानी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व फ. ए. सोसायटीचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे उपस्थित होते. आमदार दीपकराव चव्हाण यांनी शिबिरार्थीनी जावली गावाला पर्यावरणीय हब बनविण्याच्या दृष्टीने केलेल्या कामाचे कौतुक केले
तर श्रीमंत संजीवराजे यांनी सद्यकालीन जागतिक तापमान वाढ व इतर पर्यावरणीय समस्याच्या दृष्टीने वृक्षारोपण करणे महत्वाचे आहे हे स्पष्ट केले. या शिबिराच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्याचा मौलिक संदेश समाजापुढे ठेवण्यात आल्याचे सांगितले.
या शिबिरासाठी श्रीराम सह. साखर कारखान्याचे माजी संचालक महादेव माने, युवा उद्योजक तुषार नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसयटीचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य प्रा .सी डी पाटिल हे विशेष उपस्थित होते तसेच जावली गावच्या सरपंच सौ. ज्ञानेश्वरी मकर, उपसरपंच दादासो ठोंबरे तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते
शिबिराच्या समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी.एच कदम यांनी केले तर या कार्यक्रमाचे अहवाल वाचन कार्यक्रमाधिकारी प्रा.मदन पाडवी यांनी केले. या कार्यक्रमासाठी जावली गावच्या प्रथम नागरिक मकर मॅडम उपसरपंच बाळू ठोंबरे तसेच पत्रकार राजेंद्र गोफने पंचायत सदस्य तंटामुक्ती निवारण समिती व सेवा सोसायटीचे चेअरमन व सदस्य उपस्थित होते पत्रकार गोफने यांनी ग्रामस्थांच्या वतीने मनोगत व्यक्त केले व शिबिराचे महत्त्व गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून असल्याचे प्रतिपादन केले तसेच यावर्षी उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून प्रतीक बनकर याची निवड करण्यात आली तर उत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून अर्पिता जाधव हिची निवड करण्यात आली. या कार्यक्रमात विद्यार्थिनी मनोगत सायली काळोखे व विद्यार्थी मनोगत दत्ता वाघमारे यांनी केले.
तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील उत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून ज्योती रिटे आणि उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून रोहन कुचेकर याची निवड करण्यात आली. कनिष्ठ विभागाच्या वतीने विद्यार्थिनी मनोगत प्रियांका शिंदे व विद्यार्थी मनोगत सिद्धांत निकाळजे यांनी केले.
कार्यक्रमाधिकारी प्रा. संतोष कोकरे, कार्यक्रमाधिकारी प्रा. सौ. योगिता मठपती,कनिष्ठ विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.गवळी प्रा. सौ. नीलम देशमुख, राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार समितीचे सर्व सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी,स्वयंसेवक व स्वयंसेविका इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. गवळी यांनी केले.