फलटण टुडे ( सातारा ) दि. 25:
“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना” राज्यस्तरावर सन 2018-19 या वर्षापासून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सन 2021-22 या वर्षामध्ये सातारा जिल्ह्यातील तत्कालीन व विद्यमान मंत्री, खासदार व आमदार यांच्या शिफारशीनुसार एकूण 344 कामे मंजूर करण्यात आली आहेत. तालुकानिहाय लोकप्रतिनिधी यांनी सुचित केलेल्या विविध विकास कामांचे प्रस्ताव व अंदाजपत्रके तयार करून सादर करण्याच्या कामी जिल्ह्यातील संबंधित पंचायत समिती मधील गट विकास अधिकारी, संबंधित गावचे ग्रामविकास अधिकारी/ ग्रामसेवक यांनी तात्काळ कार्यवाही करावी. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांनी मंजूर कामांचे नकाशे/आराखडे व अंदाजपत्रके सुधारीत 18 टक्के जी. एस.टी दरानुसार तयार करून सहायक आयुक्त, समाज कल्याण, सातारा कार्यालयामध्ये तात्काळ सादर करावेत, असे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.