73 व्या प्रजासत्ताक दिनी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक विद्यामंदिर,मुधोजी बालक मंदिर, माझे घर येथेमा वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर शाळा समितीचे चेअरमन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व पुढील कार्यक्रमास सुरुवात झाली. सन 2022-2 3मधील विद्यार्थ्याची मैदानी व बौद्धीक स्पर्धांचे प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण सोहळा पार पडला.
त्यानंतर इ.1ली ते 4थी व बालवाडीच्या विद्यार्थ्यांकडून चेंडू कवायत, विविध प्रकारचे मनोरे,भाषणे,देशभक्तीपर गीत,नृत्य सादर करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी, मा.नेगरसेविका सौ.कापसे मॅडम तसेच निमंत्रीत सदस्या श्रीमती निर्मला सतीश रणवरे मॅडम ,प्रशालेचे मुख्याध्यापक श्री रुपेश शिंदे सर,नवीन प्राथमिक विद्यामंदिर,मुधोजी बालक मंदिर, माझे घर सर्व मुख्याध्यापिका ,शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी,पालक उपस्थित होते.
सूत्र संचालन प्रशालेचे उपशिक्षक श्री साबळे सर यांनी केले व श्री रामचंद्र शिंदे सर यांनी आभार व्यक्त केले.