फलटण टुडे (आसू) दि २३: –
फलटण पंचायत समितीचे माजी सभापती आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे यशवंतसिंह निंबाळकर तथा श्रीमंत बाळराजे खर्डेकर यांचा वाढदिवस दिनांक 25 रोजी विविध उपक्रमाने साजरा करण्यात येणार आहे
वाढदिवसानिमित्त सकाळी कुलदैवत भवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या सुविध्य पत्नी श्रीमंत दिव्यजलीराजे निंबाळकर (खर्डेकर )औक्षण करतील. ग्रामदैवत श्री काळेश्वर मंदिरात सकाळी अभिषेक केल्यानंतर सकाळी ९:३०वा. रक्तदान शिबिराचे उद्घाटन, सकाळी १० वाजता फाॅरेष्ट येथील जागेवर वृक्षारोपण कार्यक्रम, सकाळीं १०:३० ग्रामपंचायत येथील व्यासपीठावर ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभास उपस्थिती, त्यावेळेसच मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिकाचे प्रकाशन आणी फलटण रक्षक या विशेशांकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे . ११:००वाजता जिल्हा परिषद शाळेला लॅपटॉप , मुलांना वही आणि खाऊचे वाटप श्रीमंत निर्मलाराजे खर्डेकर हायस्कूल येथे मुलांना खाऊ वाटप आणी दुपारी १२:३० ते ३:०० या वेळेत मान्यवरांचे सत्कार स्वीकारण्यासाठी हजर असतील