चित्रपट म्हणजे समाजाचे प्रतिबिंब: किरण गुजर

‘चल रे फौजी’ चा फर्स्ट प्रिव्ह संपन्न 

चल रे फौजी या चित्रपटाच्या टेक्निकल टीजर प्रसंगी किरण गुजर आनंद भोईटे घन: श्याम येडे व इतर मान्यवर


फलटण टुडे (बरामती ): 
चित्रपट च्या प्रभावाने समाज्यातील अनिष्ट रूढी ,परंपरा दूर होऊन सामाजिक प्रबोधन होत असल्याने चित्रपट म्हणजे समाजाचे प्रतिबिंब असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नगरसेवक व सेन्सॉर बोर्डाचे माजी सदस्य किरण गुजर यांनी केले.
मातृ पितृ फिल्म कंपनीचे संचालक घन:श्याम येडे निर्मित ‘चल रे फौजी’ या चित्रपटाचा टेक्निकल टीचर फर्स्ट प्रिव्ह च्या शुभारंभ प्रसंगी किरण गुजर बोलत होते
या प्रसंगी पुणे ग्रामीण चे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, जय जवान आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष हनुमंत निंबाळकर,उद्योजक रणजित शिंदे, माजी उपनगराध्यक्ष अभिजित जाधव व राहुल जगताप,मेजर ज्ञानदेव नाळे, कुमार परदेशी आदी मान्यवर उपस्तीत होते.
सीमेवर जवान लढत असताना देशवासीय सुखरूप राहतात परंतु जवान शहीद झाल्यावर कुटूंबीय ची अवस्था काय होते ? यांचे यतार्थ चित्रण असून समाज्याने सैनिका बद्दलचा अभिमान बाळगून त्यांना आदर्श मानले पाहिजे असेही किरण गुजर यांनी सांगितले.
फक्त 26 जानेवरी व 15 ऑगस्ट रोजी सैनिकांची आठवण न करता त्याच्या कार्याचे जीवनभर आठवण ठेवावी व पोलिसांच्या जीवनावर सुद्धा चित्रपट निर्मिती व्हावी अशी अपेक्षा पुणे ग्रामीण चे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांनी केली
चित्रपट निर्मितीच्या माध्यमातून घन:श्याम येडे यांनी आत्तापर्यंत सामाजिक प्रबोधनाचे उत्कृष्ट काम केल्याचे प्रतिपादन उद्योजक रणजीत शिंदे यांनी केले.
सैनिक व कुटुंब यांची कहाणी घरघरात चित्रपटाच्या माध्यमातून पोहचेल अशी अपेक्षा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष हनुमंतराव निंबाळकर यांनी व्यक्त केली.
 सैनिकांबद्दलचा अभिमान सर्वांनी बाळगाला पाहिजे त्यांच्याबद्दलचा आदर समाजामध्ये पसरला पाहिजे व शासनाने सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात सहकार्य केले पाहिजे आणि चित्रपटाच्या माध्यमातून सैनिक व कुटूंबियाचे जीवन दाखविण्याचा प्रयत्न असल्याचे निर्माते लेखक दिग्दर्शक अभिनेते घन:श्याम येडे यांनी सांगितले.
या प्रसंगी चित्रपटातील फलटण व बारामती तालुक्यातील कलाकारांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले 


 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!