श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण येथील खेळाडू विद्यार्थ्याची ऑल इंडिया कुस्ती स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्तरावर निवड झाली. ऑल इंडिया राष्ट्रीय कुस्ती क्रीडा स्पर्धा दि. २० ते २५ जानेवारी २०२३ या कालावधीत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (महाराष्ट्र) या ठिकाणी संपन्न होणार आहेत. या राष्ट्रीय कुस्ती क्रीडा स्पर्धेसाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील पवार आदित्य अतुल या विद्यार्थ्यांची ९७ किलो वजन गटातून राष्ट्रीय स्तरावरील होणाऱ्या ऑल इंडिया कुस्ती क्रीडा स्पर्धेसाठी निवड मिळवून महाविद्यालयाचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर वाढविला. सदरील क्रीडा स्पर्धेसाठी प्रशिक्षक व मार्गदर्शक म्हणून क्रीडा विभागाचे सहायक प्राध्यापक श्री. प्रशांत सावंत लाभले.
ऑल इंडिया कुस्ती क्रीडा स्पर्धेसाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या, महाविद्यालय, फलटण येथील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती मा. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष व जिल्हा परिषद, सातारचे माजी अध्यक्ष, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटणचे सेक्रेटरी मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटणचे मे. गव्हर्निंग कौंसिलचे सभासद सदस्य, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम, अधिक्षक श्री. श्रीकांत फडतरे, प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्याचे, क्रीडा विभागाचे प्राध्यापक श्री. प्रशांत सावंत यांचे अभिनंदन केले व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.