फलटण टुडे (जावली ) : –
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कृत विशेष श्रमसंस्कार शिबिर सन २०२२-२३ मौजे जावली, तालुका फलटण, जि. सातारा येथे दि. १९ जानेवारी २०२३ रोजी शिबिराच्या प्रबोधनपर व्याख्यानमाला कार्यक्रम प्रसंगी प्रमुख व्याखाते म्हणून मा. सौ. संजना आढोळे, महिला बालविकास अधिकारी, पंचायत समिती, फलटण यांनी महिला सबलीकरण करण्यातूनच देशाचा विकास शक्य आहे. ग्रामीण भागतील महिलांचे जीवनमान उंचावणे व त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होणे ही काळाची गरज आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे सबलीकरण व आर्थिक सक्षमीकरण झाले असून, बचत गटाच्या माध्यमातून महिलांना निश्चितच आर्थिक आधार दिला आहे. कष्टकरी व गरीब महिलांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक मदत दिली पाहिजे
असे प्रतिपादन रा.से.यो. चे स्वयसेवक व उपस्थित जावली गावातील महिला यांना उद्देशून केले. या व्याख्यानमाला कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मा. सौ. प्रतिक्षा खेतमाळीस, दुग्ध विकास अधिकारी, गोविंद मिल्क प्रा. लि. फलटण यांनी आत्मनिर्भर होण्यासाठी महिलांनी विविध कौशल्य आत्मसात करावीत. स्वयंरोजगाराच्या अनेक संधी आहेत त्या प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे कौशल्य असण्याची गरज आहे. भारताला एक समृद्ध राष्ट्र म्हणून पुढे यावयाचे असेल तर महिला सबलीकरण, सक्षमीकरण आणि आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण अतिशय आवश्यक आहे. शेती करतानाच महिलांनी शेतीपूरक व्यवसाय जसे की भाजीपाला व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, शेळी पालन, मत्स्य व्यवसाय, परसातील कोंबडी पालन सुरू करावेत असे प्रतिपादन रा.से.यो. चे स्वयसेवक व उपस्थित जावली गावातील महिला यांना उद्देशून केले.
सदरील राष्ट्रिय सेवा योजना पुरस्कृत श्रमसंस्कार शिबिर अंतर्गत व्याख्यानमाला प्रसंगी मा. रामदास राजगोडा सेवानिवृत्त शाळा तपासणी अधिकारी, फ.ए.फ., मा. सौ. ज्ञानेश्वरी मकर, सरपंच, ग्रामपंचायत, जावली, श्री.रामदास ठोंबरे, उपसरपंच, जावली, ग्रामपंचायत सदस्य तथा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, जावलीचे चेअरमन व पत्रकार श्री. राजकुमार गोफणे, प्रा.एस पी. तरटे, प्रा. एम.एस बिचुकले,कार्यक्रम अधिकारी, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण, प्रा. टी.एन शेंडगे, कार्यक्रम अधिकारी, अभियांत्रिकी महाविद्यलय, फलटण, जावली गावातील युवक, ग्रामपंचायत सदस्य, महिला भगिनी, बहुसंख्येने उपस्थित होते.