शाश्वत विकासाला प्राधान्य देवुन युवकांनी नोकरदार न होता उद्योजक व्हावे : प्रा. रविंद्र काळेबेरे

फलटण टुडे (जावली ) : –

    फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कृत विशेष श्रमसंस्कार शिबिर सन २०२२-२३ मौजे जावली, तालुका फलटण, जि. सातारा येथे दि. १८ जानेवारी २०२३ रोजी शिबिराच्या प्रबोधनपर व्याख्यानमाला कार्यक्रम प्रसंगी प्रमुख व्याखाते म्हणून प्रा. रविंद्र काळेबेरे, रसायन शास्त्र विभाग, मुधोजी महाविद्यालय, फलटण यांनीसध्याच्या पिढी सोबतच भविष्यातील पिढीसाठी सुरक्षित, समृद्ध व आशादायक जग निर्मिती हे उद्दिष्ट मानून काम करण्याची गरज असून त्यासाठी भविष्यातील पिढीला केंद्रबिंदू म्हणून शाश्वत विकासाची आणि उद्योजकता विकसित करण्याची संकल्पना राबविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन रा.से.यो. चे स्वयसेवक व उपस्थित जावली गावातील युवक यांना उद्देशून केले. या व्याख्यानमाला कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मा. डॉ. शांताराम गायकवाड, महाव्यवस्थापक, गोविंद मिल्क प्रा. लि. फलटण यांनी सरकारी आणि खासगी क्षेत्रांमध्ये नोकरीसाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे तर दुसऱ्या बाजूला उद्योग व व्यवसायात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहे. त्यामुळे युवकांनी नोकरीच्या मागे न धावता स्वत:मधील उद्योजकाचा शोध घ्यावा व उद्योजक बनावे तरुणांनी त्यांच्यामधील उद्योजकतेचा विकास करावा. उद्योगासाठी आज शासन सर्वतोपरी मदत करीत आहे; पण उद्योग उभा करण्याअगोदर उद्योगासाठी आवश्यक तांत्रिक व व्यवस्थापकीय कौशल्य आत्मसात करावे असे प्रतिपादन रा.से.यो. चे स्वयसेवक व उपस्थित जावली गावातील युवक यांना उद्देशून केले. 
    सदरील राष्ट्रिय सेवा योजना पुरस्कृत श्रमसंस्कार शिबिर अंतर्गत व्याख्यानमाला प्रसंगी श्री.रामदास ठोंबरे, उपसरपंच, जावली, ग्रामपंचायत सदस्य तथा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, जावलीचे चेअरमन व पत्रकार श्री. राजकुमार गोफणे, श्री. रोफ सय्यद, कार्यक्रम अधिकारी, प्रा.एस पी. तरटे, प्रा. एम.एस बिचुकले,कार्यक्रम अधिकारी, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण, प्रा. टी.एन शेंडगे, कार्यक्रम अधिकारी, अभियांत्रिकी महाविद्यलय, फलटण, प्रा. रविंद्र लोणकर, श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय, फलटण, जावली गावातील युवक, ग्रामपंचायत सदस्य, महिला भगिनी, बहुसंख्येने उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!