फलटण तुडे (सातारा ) दि. 19 :
महाबळेश्वर विटा राज्य महामार्ग क्रं. १४० वरील मौजे धामणेर, ता. कोरेगांव, येथील रेल्वे लाईनवरील उड्डाणपुलाच्या रॅम्प पोर्शनचे काम होणार आहे. या अनुषंगाने पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी दिनांक २३ जानेवारी २०२३ रोजीच्या १०.०० वा. पासुन ते दिनांक २२ फेब्रुवारी २०२३ रोजी पर्यंत महाबळेश्वर विटा राज्यमार्ग क्रं. १४० वरील वाहतुक नियमनामध्ये खालीलप्रमाणे बदल केलेआहे.
महाबळेश्वर विटा राज्य महामार्ग क्रं. १४० वरील हलक्या वजनाच्या वाहनांची वाहतुक पुर्ववत सुरु राहील.अवजड वाहतुक करणारे वाहनांना मौजे धामणेर ता. कोरेगांव येथुन प्रवास करता येणार नाही. विटामार्गे येणारी अवजड वाहतुक वाहने मौजे रहिमतपुर येथुन कोरेगांव मार्गे सातारा येथे जातील. सातारा मार्गे येणारी जड वाहतुक वाहने सातारा – कोरेगांव – रहिमतपुर या मार्गे विटा येथे जातील. वाहनचालकांना अन्य मार्गांचा वापर करावयाचा असल्यास ते अन्य मार्गाचा वापर करु शकतील.
तरी महाबळेश्वर विटा राज्य महामार्ग क्रं. १४० वरील वाहतुक बदलांची सर्व नागरिकांनी नोंद घेवुन पोलीस दलास सहकार्य करण्याचे आवाहन श्री. शेख यांनी केले आहे.