फलटण टुडे (सातारा )दि. 19 : –
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त शासकीय माध्यमिक आश्रम शाळा बामणोली येथे मराठी भाषा संवर्धन आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 विषयी विधी सेवा जनजागृती शिबीर साजरे करण्यात आले.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव यांनी मराठी भाषा संवर्धनासाठी सर्वस्तरांवर प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
तसेच ॲङ मनिषा बर्गे यांनी लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 या संबंधी मार्गदर्शन केले.