डावीकडून रमेश दादा गावडे राजू गावडे पाटील श्रीमती आसराबाई गावडे यांच्याकडून चेक स्वीकारताना स्वातीताई डेंबडे आणि वधू -वर
फलटण टुडे (गोखळी प्रतिनिधी) : –
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील खटकेवस्ती गावचे सुपुत्र राजेंद्र नारायण गावडे (पाटील) यांनी आपल्या मुलीच्या लग्नाचे अवचित साधून ईतर अनावश्यक खर्चांना फाटा देत खटकेवस्ती येथील” देवराई ” नवीन प्रकल्पासाठी ५०००रु.ची देणगी देवराईचे सर्वेसर्वा डॉ.विकास खटके, रमेश गावडे (सवई) यांच्याकडे सुपूर्त केली आणि कात्रज पूणे येथील “*आसरा*” अनाथांचा हक्काचा निवारा या संस्थेला संस्थाचालक सौ.स्वातीताई डिंबळे यांच्याकडे राजू गावडे (पाटील) यांच्या मातोश्रींच्या हस्ते ५०००/रु.ची मदत देण्यात आली. वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी पुणे, नगर, मंबई, बुलढाणा, बुराहनपुर भागातून सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.अशा या स्तुत्य उपक्रमाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे. राजू गावडे (पाटील )यांचा नेहमीच सामाजिक कार्यासाठी अठ्ठहास असतो.