फलटण टुडे सातारा दि. 18 :
मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड़मय निर्मितीसाठी प्रकशन वर्ष 2022 करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड़मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दि. 31 जानेवारी 2023 पर्यंत पाठवावी असे सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांनी कळविले आहे.
दि. 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची प्रवेशिका व नियमावली मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in व महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. प्रवेशिका पूर्ण भरून आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रविंद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400 025 येथे दि. 31 जानेवारी 2023 पर्यंत पाठवाव्यात.