सातारा, दि.25 (फलटण टुडे ) : –
बालगृहातील प्रवेशितांसाठी 17 ते 19 जानेवारी 2023 या कालावधीत श्रीमंत छत्रपती शाहु जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे यांनी दिली.
या महोत्सवामध्ये खो-खो, कबड्डी, क्रिकेट, 100, 200 व 400 मीटर धावणे, रिले, गोळाफेक, थाळी फेक, लिंबू चमचा यासह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. बालमहोत्सवास जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या चाचा नेहरु बाल महोत्सावाचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम 19 जानेवारी 2023 रोजी होणार असल्याचेही श्री. तावरे यांनी कळविले आहे.