जनतेसाठी केलेले कार्य हीच खरी जीवनातील ओळख : अजित पवार

अजित पवार यांच्या हस्ते साहित्य वाटप करताना सोबत ऋतुराज काळे व इतर


बारामती ( फलटण टुडे ): 
सामान्य जनतेसाठी वर्षभरात विविध उपक्रम राबवून केलेले कार्य हीच जीवनात खरी ओळख निर्माण करून देतात असे प्रतिपादन राज्याचे 
 विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.
रविवार १५ जानेवरी रोजी 
स्वर्गीय अर्जुनराव काळे यांच्या स्मरणार्थ डॉ. ऋतुराज अर्जुनराव काळे परिवाराच्या वतीने १ हजार गरजु महिलांना स्वेटर वाटप , पाचशे गरजू महिलांना साडी वाटप, १५ गरजू महिलांना शिलाई मशीन तसेच सायकल वाटप कार्यक्रम विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते रोजी करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी माजी नगरसेवक किरण गुजर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र बनकर,मा.उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, अपर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे ,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, मुख्याधिकारी महेश रोकडे,
पुणे उद्योग विभाग अध्यक्ष अरविंद चांडक, मा. उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, मा.नगरसेवक सुधीर पानसरे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ, मा.नगरसेवक अभिजीत चव्हाण, डॉ.गोकुळ काळे, डॉ रणजीत मोहिते, संयोग काळे, डॉ.सुनील काळे उपस्थित होते.
कै.अर्जुन राव काळे यांनी संघर्षातून पोलीस क्षेत्रामध्ये स्वतःचे नाव कमावले त्यानंतर आपण समाजासाठी काही तरी देणे लागतो.थंडीच्या काळात डॉ. ऋतुराज काळे यांनी स्वेटर वाटप करून मायेची,प्रेमाची उभ दिली. तसेच पाचशे गरजू महिलांना साडी वाटप, १५ गरजू महिलांना शिलाई मशीन तसेच सायकल वाटप केल्याबद्दल डॉ. ऋतुराज काळे यांचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कौतुक केले.
सूत्रसंचालन सावळेपाटील यांनी केले

 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!