फलटण टुडे दि.14 :
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांचा ध्यास, ग्राम शहर विकास या घोष वाक्याखाली राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कृत विशेष श्रमसंस्कार शिबिर सन २०२२-२३ मौजे जावली, तालुका फलटण, जि. सातारा येथे दि. १६ जानेवारी ते २२ जानेवारी २०२३ या कालावधीत आयोजन केल्याचे माहिती प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी दिली.
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मौजे जावली येथे स्वच्छ गाव समृध्द गाव, शास्वत व सर्वांगीण ग्रामीण विकास, ग्राम सर्वेक्षण व गावचा इतिहास, स्त्री जन्माचे स्वागत व बालविवाह बंदी, व्यसनमुक्ती व आरोग्य सवर्धन, मतदार जनजागृती अभियान, वृक्षारोपण, माती परीक्षण, रस्ता नवनिर्माणकरण, समाज प्रबोधन, परसबाग निर्मिती, कांदा प्रक्रिया पदार्थ प्रशिक्षण, दुग्ध प्रक्रिया पदार्थ प्रशिक्षण, यासारखे सामाजिक जिव्हाळ्याचे व कृषि संबधित उपक्रम शिबिर कालावधीत गावामध्ये राबविणार असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.
एस. डी. निंबाळकर यांनी सांगितले. या शिबिर कालावधीमध्ये तरुण पिढी समोरील आव्हाने व व्यसनमुक्त भारत, स्वच्छ व सदृढ भारत अभियान, व्यसनमुक्ती जनजागृती, शाश्वत जगाची निर्मिती, ग्रामीण महिलांचे सबलीकरण, पर्यावरण
सवर्धन व मानवी जीवन, राष्ट्र उभारणीत युवकांचे योगदान, शेतीपूरक व्यवसाय व ग्रामीण विकास, उद्योजकता व व्यक्तिमत्त्व विकास यासारख्या विविध विषयावर तज्ञांचे व्याख्यान व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या या श्रमसंस्कार शिबिरासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती मा. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष व जिल्हा परिषद, सातारचे माजी अध्यक्ष, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटणचे सेक्रेटरी मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटणचे मे. गव्हर्निंग कौंसिलचे सभासद सदस्य, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम, अधिक्षक श्री. श्रीकांत फडतरे यांनी शुभेच्छा व्यक्त करून परिसरातील महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यानी तसेच मौजे जावली गावातील ग्रामस्थ विशेष करून महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेवुन स्वयंसेवकांना सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच मौजे जावली गावचे सरपंच मा. सौ. ज्ञानेश्वरी मकर यांनी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक हे उत्कृष्ट काम करतील असा आशावाद व्यक्त केला