सातारा दि. 13 (फलटण टुडे ): प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियान सन 2022-23 अंतर्गत जिल्ह्यातील 15 ते 45 वयोगटातील बेरोजगार युवक व युवतींना औद्योगिक आस्थांपनांद्वारे प्रशिक्षण देण्याचे लक्ष प्राप्त झाले आहे.
तरी हे प्रशिक्षण देऊ इच्छित असलेल्या जिल्ह्यातील औद्योगिक आस्थापनांनी दि. 20 जानेवारी 2023 पर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा कार्यालयास संपर्क साधावा. यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क असे आवाहन सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.