बारामती ( फलटण टुडे ): –
बारामती तालुक्यातील
ग्रुप ग्रामपच्यात बऱ्हाणपूर,नेवतवळण
येथे स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली.
श्री भैरवनाथ तरुण मंडळातर्फे बाळासाहेब मारुती चांदगुडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जिजाऊंना व स्वामी विवेकानंदा यांना मानवंदना देण्यात आली.
श्री भैरवनाथ मंडळाचे अध्यक्ष अक्षय चांदगुडे ,अमित चांदगुडे, जिजाऊ भवन चे व्यवस्थापक अमोल चांदगुडे व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते तसेच मंडळाचे सर्व युवक उपस्थित होते.
जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे विचार आजही प्रेरक असून त्यांच्या विचाराने जीवनाचे सार्थक होत असल्याचे बाळासाहेब चांदगुडे यांनी सांगितले.
आभार अमोल चांदगुडे यांनी मानले.