बारामती मध्ये राजमाता जिजाऊ चौक नामकरण संपन्न

राजमाता जिजाऊ चौक नामकरण करताना युवराज देशमुख व इतर

बारामती ( फलटण टुडे ): –
राजमाता जिजाऊ( गुरुवार १२ जानेवारी) यांच्या जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान सुर्यनगरी बारामती यांच्या वतीने बारामती शहरातील भिगवण रोड वरील सिटीईन हॉटेल व सुर्यनगरी नजीक असलेल्या चौकाचे राजमाता जिजाऊ चौक असे नामकरण 
राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष युवराज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी उद्योजक विलास परकाळे, महेश साळुंके व उदयसिंग देशमुख,आण्णा शितोळे, ज्ञानेश्वर जगताप,अक्षय पवार, सूरज खलाटे, अनिकेत मागाडे, ऋषिकेश घोळवे, विशाल डांगे, प्रतीक ठोंबरे, विजू लोले 
आदी मान्यवर व शिवप्रेमी युवक मोठ्या संख्येने उपस्तीत होते.
शहरातील मोठया प्रमाणात वाहतूक होणारा चौक म्हणजे राजमाता जिजाऊ चौक म्हणून खास वेगळी ओळख निर्माण होईल व नागरिकांच्या सोयीसाठी चारही बाजूला संस्थेचे नाव दिशा दर्शक फलक लावले जातील व नगरपरिषद च्या मार्गदर्शनाखाली चौकाचे सुंदर सुशोभीकरण करून वाहतूक खोळंबा होऊ नये या साठी वाहतूक पोलीस यांना प्रतिष्ठान च्या वतीने मदतणीस देणार असल्याचे युवराज देशमुख यांनी सांगितले.
  सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सावळेपाटील यांनी केले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!