सातारा दि. 10 (फलटण टुडे ): –
जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे, योगदानाचे मुल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी जास्तीत जास्त खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांनी 18 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी केले आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांनी जिल्हा क्रीडा पुरस्कराचे परिपूर्ण अर्ज 18 जानेवारी 2023 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी ही कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन श्री. युवराज नाईक यांनी केले आहे.