बेरोजगार उमेदवारांसाठी दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी प्लेसमेंट ड्राईव्ह

सातारा दि. 5 ( फलटण टुडे ): 
 जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील रिक्त पदांवर बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी प्लेसमेंट ड्राईव्ह होणार आहे. तरी जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.

गरजु विद्यार्थ्यांनी कौशल्य विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करुन ऑनलाईन अर्ज करावा व स्वखर्चाने आपल्या कागदपत्रांसह प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री. पवार यांनी केले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!