सातारा दि. 5 ( फलटण टुडे ) : शासकीय आय टी आय मोळाचा ओढा सातारा येथे दि. 9 जानेवारी 2023 रोजी शिकाऊ उमेदवारी, रोजगार भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सन 2022मध्ये आय टी आय उत्तीर्ण झालेल्या व्यवसाय प्रशिक्षणार्थींनी ओळखपत्र, सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांचा एक झेरॉक् संच व फोटोसह सकाळी 9 वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस. एम. मांगलेकर व सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागर एम. के. उपाध्ये यांनी केले आहे.
शासकीय आय टी आय येथे 9 जानेवारी रोजी शिकाऊ उमेदवारी, रोजगार भरती मेळावा
अधिक माहितीसाठी शासकीय आय टी आय मोळाचा ओढा सातारा येथे संपर्क साधावा. निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित कंपनीकडून विद्यावेतन, मोफत कॅन्टीन व ट्रान्सपोर्ट सुविधा दिली जाणार आहे.