यशस्वी खेळाडूंचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला यावेळी प्राचार्य गंगवणे बी.एम., धुमाळ एस .जे.,तुषार नाईक निंबाळकर ,राहुल निंबाळकर इत्यादी
फलटण ( फलटण टुडे ) :
छत्रपती शाहू स्टेडियम सातारा येथे संपन्न झालेल्या शालेय विभागीय किक बॉक्सिंग स्पर्धेत मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील 17 वर्षाखालील मुलींच्या गटात कुमारी अंजली अमोल रोमन इयत्ता नववी हिने विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला
तसेच 19 वर्षाखालील मुलींच्या गटात इयत्ता 12वी मधील कुमारी गीतांजली जयराम बंडगर हिने प्रथम क्रमांक मिळविला .या दोन्ही मुलींची बुलढाणा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे . सन 2018- 19 मध्ये लुधियाना पंजाब येथे झालेल्या 14 वर्षाखालील राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये कुमारी अंजली रोमन या विद्यार्थिनीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून रोप्य पदक पटकावले होते.
तसेच ब्रिलियंट अकॅडमी मधील कुमारी धनश्री तेली 14 वर्षाखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक मिळवून याही मुलीची बुलढाणा येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
या सर्व यशस्वी खेळाडूंना श्री नाळे एस. ए. यांनी मार्गदर्शन केले. या सर्व यशस्वी खेळाडूंचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला या यशस्वी खेळाडूंना व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना विधान परिषदेचे माजी सभापती तथा विधान परिषद विद्यमान सदस्य श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ,फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर , फलटण एज्युकेशन सोसायटीच्या
क्रीडा समितीचे चेअरमन श्री शिवाजीराव घोरपडे साहेब, क्रीडा समितीचे सर्व सदस्य, स्कूल कमिटीचे सर्व पदाधिकारी व सदस्य ,फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकम अधीक्षक श्रीकांत फडतरे तसेच प्रशालेचे प्राचार्य उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक यांनी अभिनंदन केले.
याप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य श्री गंगवणे बी.एम. , क्रीडा विभाग प्रमुख श्री धुमाळ एस .जे., राहुल निंबाळकर, तुषार नाईक निंबाळकर व या यशस्वी खेळाडूंचे पालक हे उपस्थित होते.