चैतन्य शिंदे याचा सत्कार करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , प्राचार्य बाबासाहेब गंगवणे , राहूल निंबाळकर ,अजित शिंदे ‘ सचिन धुमाळ
फलटण ( फलटण टुडे ) : –
इचलकरंजी येथे झालेल्या विभाग स्तरीय शालेय जलतरण स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूलच्या चैतन्य अजित शिंदे यांने 14 वर्षाखालील गटामध्ये 100 मिटर बटरफ्लाय व 200 मिटर बटरफ्लाय या प्रकारामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. तसेच 400 मिटर फ्रीस्टाइल प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथे झालेल्या बाराव्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेमध्ये तीन किलोमीटर गटांमध्ये राज्यात पाचवा क्रमांक मिळवला. या सुयशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब यांच्या शुभहस्ते त्याचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रशालेचे प्राचार्य माननीय श्री गंगवणे बी.एम, क्रीडा विभाग प्रमुख श्री धुमाळ एस. जे., श्री राहुल निंबाळकर, श्री तुषार नाईक निंबाळकर व पालक श्री अजित शिंदे हे उपस्थित होते.