प्राक्षिण शिबीर प्रसंगी मार्गदर्शन करताना
प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर व इतर मान्यवर
फलटण (फलटण टुडे ) :-
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण व कृषि महाविद्यालय, फलटण आणि पंचायत समिती, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण तालुक्यातील महिला बाल कल्याण व उमेद स्वयसहायता समूहातील महिलांकरिता दुग्धजन्य खाद्यपदार्थ बनविण्याचे एक दिवसीय प्रशिक्षण दिनांक ३० डिसेंबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आले. सदरील प्रशिक्षणाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी स्वयसहायता समूहातील महिलांनी दुग्धजन्य पदार्थ प्रक्रियेतून उद्योजिकता विकसित करून स्वयंपूर्ण व्हावे व समाजात महिला सक्षमीकरनासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन स्वयसहायता महिला समूहांना केले.
कृषि महाविद्यालय, फलटण येथील दुग्धशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. आर. वी. करचे व बी. एस. सी. (कृषि)चे आठव्या सत्रातील अनुभव आधारित कृषि शिक्षण अंतर्गत विद्यार्थ्यांनी सदरील प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. महिला बाल कल्याण व उमेद – स्वयसहायता समूहातील महिलांना उद्योजिकता विकसित व्हावी व आर्थिकदृष्ट्या महिला सबलीकरण व्हावे या उद्देशाने सदरील प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले होते. सदरील एक दिवसीय प्रशिक्षनामध्ये सुगंधी दुध, कुल्फी, लस्सी, बासुंदी, पनीर इत्यादी पदार्थ बनविण्याचे एक दिवसीय प्रशिक्षण महिलांना देण्यात आले.
सदरील एक दिवसीय प्रशिक्षणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून फलटण तालुक्याचे सहायक गट विकास अधिकारी श्री. सतिश कुंभार उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन करताना महिलांनी प्रक्रियायुक्त दुग्धजन्य पदार्थ तयार करण्याची प्रक्रिया समजुन घेवुन ग्रामीण भागांमध्ये उद्योजिकता विकसित करावी असे आवाहन महिलांना केले. एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये स्वयसहायता समूहातील फलटण तालुक्यातील ३० महिला सहभागी झाल्या. सदरील प्रशिक्षण कार्यक्रम पुर्ण झाल्यानंतर महिलांनी प्रशिक्षण आयोजन केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, दुग्धशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. आर. वी. करचे यांचे आभार व्यक्त केले. सदरील एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी वैष्णवी गायकवाड व आभार प्रदर्शन डॉ. आर. वी. करचे यांनी केले.