श्रीमंत भैय्यासाहेब राजमाने महाविद्यालय, म्हसवडच्या खेळाडूंचे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत सातारा विभागीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश

फलटण (फलटण टुडे ) :-

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत सातारा विभागीय कुस्ती स्पर्धा २०२२ चे आयोजन डी.पी भोसले महाविद्यालय, कोरेगाव ता. कोरेगाव येथे दि.१० व ११ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेत सातारा विभागातील एकूण २८ महाविद्यालयांच्या सुमारे ८३० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कोरेगाव तालुक्याचे तहसीलदार मा. श्री . पी .एस. कदम साहेब व अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. विजयसिंह सावंत हे लाभले. यावेळी सातारा विभागातील विविध महाविद्यालयाचे स्पर्धेसाठी आलेले शारीरिक शिक्षण संचालक उपस्थित होते. या स्पर्धेत श्रीमंत भैय्यासाहेब राजमाने महाविद्यालय, म्हसवडचे खेळाडू यांनी उत्तम कामगिरी केली. यामध्ये कुस्ती मधील फ्रीस्टाइल या प्रकारात 61 किलो वजन गटात कु. अण्णा मदने यांनी सुवर्णपदक व 70 किलो वजन गटात कु. प्रसाद पुकळे याने सुवर्णपदक तसेच या प्रकारात 67 किलो वजन गटात कु. गणेश खांडेकर यांनी सुवर्णपदक व 60 किलो वजन गटात कु. विशाल ओंबासे याने रोप्य पदक पटकावले. या सर्व खेळाडूंची वेणूताई चव्हाण महाविद्यालय, कराड या ठिकाणी दि.१५ व १६ डिसेंबर २०२२ रोजी होणाऱ्या शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशस्वी खेळाडूंना श्री. महालिंग खांडेकर (NIS कुस्ती कोच) प्रा. प्रियंका खांडेकर व प्रा. तायाप्पा शेंडगे यांनी मार्गदर्शन केले. या यशस्वी खेळाडूंचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे मा. सभापती नामदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फ. ए. सोसायटीचे चेअरमन माननीय श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फ. ए. सोसायटीचे सेक्रेटरी माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य , प्रशासन अधिकारी मा. श्री . अरविंद निकम, अधीक्षक मा. श्री. श्रीकांत फडतरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस .टी. कदम , आणि प्रा. सरक सर, प्रा. पवार , प्रा. सावंत आणि प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!