*मुधोजी कनिष्ठ महाविद्यालय , फलटणच्या खेळाडूंचे सातारा जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत वर्चस्व*.🏃♂️🥇
फलटण – छञपती शाहू क्रीडा संकुल , सातारा या ठिकाणी दि. 19 ते 21 डिसेंबर 2022 या कालावधीत झालेल्या सातारा जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत मुधोजी कनिष्ठ महाविद्यालय,फलटणच्या खेळाडू यांनी वर्चस्व गाजवत यश मिळविले .यशस्वी खेळाडू पुढील प्रमाणे 19 वर्षांखालील मुले व मुली
1) कु. गणेश काशिद , 200 मी. धावणे.व 400 मी. धावणे प्रथम क्रमांक
2) कु. बापूराव तरडे ( एन. सी.सी. कँडेटस) – 800 मी.धावणे. प्रथम क्रमांक
3) कु. सुरज इंगळे – (एन.सी.सी.कँडेटस) – 400 मी.धावणे – तृतीय क्रमांक
4) कु. रशिका मोहिते -(एन.सी.सी.कँडेटस) 1500 मी. धावणे – तृतीय क्रमांक
5) 4*400 मी. रिले धावणे – मुले (एन.सी.सी.कँडेटस ) – प्रथम क्रमांक.
१) कु. बापुराव तरडे
२) कु.गणेश काशिद
३) कु.ओमकार नरळे
४) कु.शिवा कर्णे
५) कु. रुतिक यादव
17 वर्षांखालील मुले
6) कु.विठ्ठल दडस -(एन.सी.सी.कँडेटस)-1500 मी.धावणे.- द्वितीय क्रमांक
7) कु. मनिष यादव – 400 मी.धावणे – प्रथम क्रमांक ,800 मी.द्वितीय क्रमांक
8) कु. संस्कार पिंगळे – 3000 मी. धावणे – प्रथम क्रमांक
वरील प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविलेले खेळाडू यांचे कोल्हापूर विभाग शालेय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे . या यशस्वी खेळाडूंना फ.ए.सो.फलटण चे मैदानी खेळाचे मार्गदर्शक श्री . राज जाधव , क्रीडा शिक्षक प्रा. तायाप्पा शेंडगे , मार्गदर्शक श्री . धिरज कचरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी खेळाडूंचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे मा. सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फ. ए. सोसायटीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर, फ. ए. सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर, फ.ए.सो.फलटण क्रीडा समितीचे अध्यक्ष श्री .शिवाजीराव घोरपडे ,प्रशासन अधिकारी मा. श्री . अरविंद निकम, अधीक्षक मा. श्री. श्रीकांत फडतरे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी.एच.कदम,उपप्राचार्य डाँ.संजय दिक्षित, उपप्राचार्य प्रा.एस.आर. वेदपाठक आणि प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.