बारामती मध्ये मराठा महासंघाचा नवीन उद्योजकांसाठी मेळावा

बारामती (फलटण टुडे ):
अखिल भारतीय मराठा महासंघ बारामती शाखा व बारामती तालुका मराठा सेवा संघ यांच्या वतीने रविवार 25 डिसेंबर रोजी जिजाऊ भवन या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार यांच्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 
 आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्या विविध 
व्यवसायासाठी कर्ज योजनांची माहिती, सारथी व व्यवसाय मार्गदर्शन मेळावा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांची माहितीपत्रक,मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP), पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP), मराठा कुणबी कुणबी मराठा दाखले विषयक माहिती,डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना,बँकेच्या कर्ज योजने बद्दल सखोल माहिती, छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे (सारथी), प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, दीनदयाळ अंत्योदय योजना
आदी योजनांची सविस्तर माहिती, मार्गदर्शन तज्ञांच्या माध्यमातून मिळणार आहे सदर कार्यक्रमासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष मा. नरेंद्रजी पाटील , अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे व एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या सहित अण्णासाहेब पाटील महामंडळाचे समन्वयक व इतर योजनेचे अधिकारी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तसेच विविध बँकांचे अधिकारी शोरूमचे स्टॉल या ठिकाणी लावणार आहेत 
रविवार दि. 25 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता.
 जिजाऊ भवन, सहयोग सोसायटी समोर, भिगवण रोड, बारामती या ठिकाणी उपस्तित राहावे व 
अधिक माहितीसाठी संपर्क
संभाजी माने 
(बारामती तालुका अध्यक्ष) 
9822 44 9306, 
आण्णासाहेब शितोळे (बारामती तालुका कार्याध्यक्ष) 
9865 69 1111, उदयसिंह देशमुख (बारामती शहर अध्यक्ष )
 8797 91 7171
 हेमंत नवसारे 
 (बारामती शहर युवक अध्यक्ष) 9765 37 3636
 अभिजीत जगताप
 (बारामती तालुका युवक अध्यक्ष) 9665 66 3896
यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!