फलटण ( फलटण टुडे ):
जात वैधता प्रमाणपत्र मिळविणे, हा विद्यार्थ्यांचा त्यासोबतच पालकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. बारावीचा निकाल लागल्याबरोबर पुढील प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र हे अत्यंत महत्त्वाचे प्रमाणपत्र असल्यामुळे ते मिळविण्यासाठी लागणारा वेळ व होणारी गैरसोय टाळण्यासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी तथा मा. जिल्हा परिषद अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या सूचनेनुसर सामाजिक न्याय विभागाच्या वतीने बारावीच्या निकालापूर्वीच विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे जातपडताळणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सामाजिक न्याय विभागाच्यावतीने मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे शुक्रवार दि .16 डिसेंबर 2022 या विशेष शिबिराच्या माध्यमातून इयत्ता १२ वी विज्ञान शाखेच्या अनेक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला व या शिबिरास प्रचंड असा प्रतिसाद दिला .
यावेळी उपस्थित ११४ विद्यार्थांपैकी १०१ विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन तयार करण्यात आली . व उरलेल्या १३ विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्रातील त्रुटी पूर्तता पूर्ण करून त्यांना त्या लवकरच दिल्या जातील अशी ग्वाही मा. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाचे श्रीकात जगदाळे यांच्या मार्फत देण्यात आली.
यावेळी बोलताना मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य बाबासाहेब गंगवणे म्हणाले की फलटण तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची समस्या अडीअडचणी दूर करण्यासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी या बाबत मार्ग काढण्यासठी संबांधीत विभागाशी चर्चा करून काही सूचना केल्या होत्या . त्याप्रमाणे जात पडताळणी शिबीराचे आयोजन मुधोजी हायस्कूल येथे करण्यात आले होते .या विशेष शिबीरास विद्यार्थ्यां मार्फत चांगला प्रतिसाद मिळाला या शिबीरात जात वैधता प्रमाणपत्रासाठी ओबीसी, व्हीजेएनटी, एससी तसेच एसबीसी आदी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र सहज उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न यामुळे निकाली निघाला आहे .व पुढील शिक्षणासाठी लागणाऱ्या कागदपत्रातून विद्यार्थ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे . असे यावेळी ते म्हणाले
यावेळी मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य मा. बाबासाहेब गंगावणे व समाज कल्याणचे अधिकारी श्रीकात जगदाळे यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांची जात वैधता प्रमाणपत्राची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड केली लवकरच ती शाळा स्तरावरती विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येतील. असे सांगितले .
यावेळी बोलताना समाज कल्याण विभाग सातारचे अधिकारी श्रीकांत जगदाळे म्हणाले की आम्ही जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अशा शिबीरांचे आयोजन केले पण फलटण तालुक्यामध्ये जो प्रतिसाद मिळाला असा प्रतिसाद अन्य कोणत्याही तालुक्यात मिळाला नाही. त्यामुळे आम्ही अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी जात वैधता प्रमाणपत्र देऊ शकलो या विशेष शिबिराचे आयोजन करण्यासाठी आम्हाला सहकार्य करणारे मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे मी विशेष आभार मानतो .
यावेळी सामाजिक न्याय विभागचे वरिष्ठ लिपीक श्रीकांत जगदाळे रोहीत आवळे व्यवस्थापक सागर काकडे समतादुत मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य एम. के फडतरे , मुधोजी हायस्कूल चे उपप्राचार्य ए वाय ननावरे , सकाळ विभागाचे पर्यवेक्षक शिवाजीराव काळे , समाज कल्याण विभाग सातारा चे कर्मचारी , १२ वी चे विद्यार्थी , पालक व इतर मान्यवर उपस्थित होते.