बारामती ( फलटण टुडे ) :
वीर सावरकर स्वीमर्स क्लबचे जलतरण प्रशिक्षक सुभाष बर्गे यांना मालवण सिंधुदुर्ग या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक मिळालेला आहे
दि 17/18 डिसेंबर 2022 रोजी राज्यस्तरीय 12वी सागरी जलतरण स्पर्धा संपन्न झाली या वेळी उदघाटन माजी खासदार निलेश राणे यांच्या शुभहस्ते व सिंधुदुर्ग मालवण जलतरण पट्टू उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
यावेळी देशभरातून 930 स्पर्धक यांनी भाग घेतला होता. वयवर्षे6 पासून55वर्षापुढील वेगवेगळ्या गटात सदर स्पर्धा संपन्न झाली बारामती मधून वीर सावरकर स्वीमर्स क्लब चे प्रशिक्षक सुभाषबर्गे व जलतरण खेळाडू दिगवीजय नलवड़े,समर्थ गावड़े, वरदा कुलकर्णी , जूनेद शेख या मुलांनी प्रथमच सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केलीआहे.
सुभाष बर्गे यानी 55वर्षा पुढील गटात 2 किमी अंतर 23:04 मी पुर्ण करून 4था क्रमांक मिळवला त्यांचा सन्मान मालवण जलतरण स्वीमर्स क्लब चे महेश थिटे व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. बारामतीतील वीर सावरकर तलावात सराव करून यश बर्गे व व त्यांच्या नेतृत्वाखाली इतर खेळाडूंनी सहभाग घेतला व यश मिळवले.
या मिळवलेल्या यशाबद्दल
कलबचे अध्यक्ष ड़ाॅ आशोक तांबे सल्लागार जवाहर शेठ वाघोलीकर,सदाशिव सातव व संचालक विश्वास शेळके आदींनी बर्गे व खेळाडूचा सत्कार केला.