फलटण (फलटण टुडे ) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य- पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय सातारा यांच्या वतीने “क्रांती बॉक्सिंग” हॉल सातारा येथे दिनांक 9 ते 11 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये 14 ,17 ,19 वर्षे शालेय मुला मुलींच्या जिल्हास्तर बॉक्सिंग स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या . या स्पर्धेमध्ये फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित सरदार वल्लभभाई हायस्कूल व जूनियर कॉलेज साखरवाडीच्या कु वैष्णवी तुषार मोहिते हिने 50 ते 52 किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक मिळवून सांगली येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .त्याबद्दल यशस्वी खेळाडू व तिचे प्रशिक्षक श्री तुषार मोहिते सर मा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब- मा सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य. मा श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर- साहेब- अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण .श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब- मा जि प अध्यक्ष सातारा . श्री भोजराज नाईक निंबाळकर साहेब- अध्यक्ष- स्कूल कमिटी. श्री बापूसाहेब नाईक निंबाळकर साहेब- व्हा चेअरमन स्कूल कमिटी. श्री अरविंद निकम सर- प्रशासन अधिकारी . श्री श्रीकांत फडतरे सर -अधीक्षक. श्री एम जी नाळे सर -प्राचार्य, सर्व स्टाफ, विद्यार्थी आणि पालक यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.