आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवा शिक्षण आरोग्य कृषी सहकार महिला विकास तसेच साहित्य सेवा इत्यादी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारतया आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन हिवाळी अधिवेशन 2022 आकुर्डी पुणे येथे संपन्न झाले या अधिवेशनासाठी कर्नाटक दिल्ली महाराष्ट्र गोवा तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून पर्यावरण संरक्षण समाजसेवा साहित्य शिक्षण आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे संस्थेचे पदाधिकारी तसेच सदस्य उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाची सुरुवात विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून व वृक्ष पूजा पर्यावरण गीत पर्यावरण पोवाडा व भरतनाट्यम नृत्य सादरीकरणाने बहारदार झाली
सदर कार्यक्रमास उद्घाटक म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य डॉक्टर विठ्ठल रावजी जाधव प्रमुख पाहुणे होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रादेशिक वनीकरणाच्या परिक्षेत्र अधिकारी सौ शितल नगराळे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ आंतरराष्ट्रीय साहित्यिक माननीय डॉक्टर मधुसूदन घाणेकर तसेच गोदान चळवळ भारत चे संस्थापक मुबारक भाई शेख आणि आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री देवा तांबे सचिव सौरभ हजारे सांस्कृतिक विभागाध्यक्ष बाबासाहेब मंडलिकउपस्थित होते
याप्रसंगी पुरस्कार प्रेरणा देतात प्रेरणेतून कार्य घडते आणि कार्यातून राष्ट्र निर्माण होते या हेतूने संपूर्ण महाराष्ट्र राज्य तसेच देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या पर्यावरण समाजसेवा वनश्री समाजभूषण हिरकणी आदर्श शिक्षक तसेच साहित्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले यामध्ये श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे *प्रा नितीन नाळे* यांच्या साहित्यकार्याची दखल घेऊन त्यांना *राष्ट्रीय साहित्यरत्न पुरस्काराने गौरविण्यात* आले*आतापर्यंत प्राध्यापक नितीन नाळे हे विविध विषयावर महाराष्ट्रभर व्याख्याने सादर झाली आहेत त्यांची 1278 व्याख्याने तसेच अनेक साहित्य संमेलनामध्ये परिसंवाद निमंत्रित कवी व्याख्याते म्हणून त्यांनी कृतीयुक्त सहभाग नोंदविला आहे याशिवाय रेडिओ वाहिनी वसुंधरा झी टॉकीज इथपर्यंत त्यांच्या साहित्य सेवेची दखल घेतली गेली आहे
प्राध्यापक नितीन नाळे यांचे मूळ गाव वाठार निंबाळकर असून वाठार निंबाळकरांनीही त्यांचा खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत तसेच गौरविण्यात आल्याबद्दल श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष श्री सुभाषराव सूर्यवंशी बेडके साहेब मानद सचिव श्री डॉक्टर सचिन सूर्यवंशी बेडके साहेब नियमक मंडळाचे सदस्य महेंद्र सूर्यवंशी बेडके साहेब सर्व कार्यकारणी सदस्य संस्थेतील सर्व प्राचार्य मुख्याध्यापक या सर्वांच्या वतीने प्राध्यापक नितीन नाळे यांचे अभिनंदन करण्यात आले