मानेवाडी ग्रामपंचायतीवर राजे गटाचे वर्चस्व

नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व इतर मान्यवर

फलटण : फलटणतालुक्यातील नुकत्याच 24 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या त्यांमध्ये पश्चिम भागातील मानेवाडी गावातील पंचवार्षिक निवडणूकीत राजे गटाच्या पॅनलचे सर्व सदस्य बिनविरोध विजयी झाले .

बिनविरोध विजयी झालेले सदस्य पुढील प्रमाणे राजेंद्र शामराव जाधव – सरपंच , मच्छिंद्र  कदम सदस्य ,रविंद्र महादेव शेडगे सदस्य ,सौ निकीता सतीश जाधव सदस्या ,सौ. लता वसंतराव माने सदस्या सौ. मंगल राजेंद्र जाधव यांची निवड बिनविरोध झाली.

या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे महाराष्ट्र राज्य विधान परिषद सरस्य तथा माजी सभापती मा. नामदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ,फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकराव चव्हाण , फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले .

वरील निवडणूक बिनविरोध होण्यासाठी खालील व्यक्तींनी मोलाचे सहकार्य केले पोपटाराव शेडगे, रघुनाथ कदम,पंढरीनाथ जाधव, माने सर ,पोपटराव जाधव, राघू कदम, भानुदास जाधव, अशोक, जाधव, सतीश जाधव, कुमार बनकर, अधिक कदम, रोहिदास मोरे, सुरेश जाधव, संतोष कदम, किरण शेडगे, अभिजीत शेडगे, संदीप जाधव ,दिनकर जाधव, बाबासो जाधव , अक्षय बनकर , दादासो जाधव ,राजेंद्र जाधव, अविनाश माने, संजय घाटगे, वैभव बनकर ,अमृत चिकणे ,निखील साळुंखे, शरद मोरे इत्यादी
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!