शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम…
होलार समाजाने राबविलेला उपक्रम कौतुकास्पद : जय पाटील
बारामती ( फलटण टुडे )दि:६ :
पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रम घेऊन होलार समाजाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी होलार समाजाच्या वतीने कौतुकास्पद उपक्रम राबविला जातो. असे प्रतिपादन बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शहराध्यक्ष जय पाटील यांनी केले.
पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती नगरपरिषद व बारामती शहर होलार समाज यांच्या संयुक्त विद्यमानाने लोकसहभागातून स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव, सेवा दलाचे अध्यक्ष अँड धीरज लालबिगे, मा. उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, पत्रकार तैनूर शेख, पत्रकार साधू बल्लाळ, आरोग्य निरीक्षक अजय लालबिगे इ मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक कार्यात होलार समाजाचा नेहमीच खारीचा वाटा असतो. पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दर वर्षी होलार समाजाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवला जात असल्याचे अँड धीरज लालबिगे म्हणाले. या वेळी कार्यक्रमास होलार समाजाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब जाधव, बाळासाहेब देवकाते, बळवंत माने, भारत देवकाते, गोरख पारसे, ईश्वर पारसे, होलार समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष निवृत्ती गोरे, युवा नेतृत्व सेवक अहिवळे, अक्षय माने, बाप्पा तोरणे, पत्रकार सुरज देवकाते उपस्थित होते. स्वच्छता अभियानात बारामती नगरपरिषदेचे पदाधिकारी तसेच महिला कर्मचारी व समाज बांधवांनी सहभाग नोंदवल्याबद्दल पत्रकार सुरज देवकाते यांनी आभार व्यक्त केले.