फलटण दि. o५ ( फलटण टुडे ):
फलटण शहराची क्रीडा क्षेत्रातील परंपरा, विशेषत: खो-खो, कबड्डी, हॉकी, कुस्ती व इतर देशीखेळातील फलटणची परंपरा स्वातंत्र्यपूर्व काळापासून आज अखेर कायम असल्याने क्रीडा क्षेत्रात फलटणचे नांव लौकीक आहे.
या पार्श्वभूमीवर फलटण येथील श्री. शिवाजीराव घोरपडे (गजेंद्रगडकर) यांची नात व उद्योजक श्री. सत्यजीत घोरपडे (गजेंद्रगडकर) यांची सुकन्या कु. देविका सत्यजीत घोरपडे या सुकन्येने स्पेन येथील न्युसिया येथील युथ बॉक्सिंगमध्ये जागतिक स्तरावर उज्वल यश मिळवीत इंग्लंडच्या खेळाडूचा ५:० ने पराभव करून सुवर्णपदक व विश्वविजेतेपद पटकावल्याने फलटणकरांची मान जागतिक स्तरावरपुन्हा एकदा अभिमामानाने फलटणकरांची मान उंचावली आहे.
कु. देविका घोरपडे या सुकन्येने आतापर्यंत बॉक्सिंगमध्ये जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीयस्तरांवर बहुमान मिळविला असून आता जागतिक स्तरावर अजिंक्यपद पटकावले असताना सुमारे २० उच्चस्तरीय स्पर्धांपैकी १८ स्पर्धेत तिनॆ सुवर्णपदके मिळविली आहेत. तिच्या या उज्वल यशाबद्दल तिचे विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे.
या पार्श्वभूमीवर फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण आयोजित जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धा युवा विश्वविजेती सुवर्ण कन्या कु. देविका घोरपडे या सुवर्णकन्येचाजाहिर सत्कार मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब), मा.सभापती, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य, यांच्या शुभहस्ते मंगळवार, दिनांक ०६ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ०४ वाजता, स्थळ : मुधोजी हायस्कूल प्रांगण, फलटण. येथे आयोजित केला आहे .
या कार्यक्रम अध्यक्ष, मा.श्री.दिपकराव चव्हाण साहेब,आमदार,फलटण-कोरेगांव विधानसभा मतदार संघ, प्रमुख उपस्थिती : मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा), चेअरमन, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण. मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), सेक्रेटरी, व फलटण एज्युकेशन सोसायटी गव्हर्निंग कौन्सिल चे सदस्य व फलटण एज्युकेशन सोसायटीचे सर्व शाखा मुख्याध्यापक , प्राचार्य शिक्षक वृंद तसेच तालुक्यातील क्रीडा मार्गदर्शक व खेळाडू उपस्थित राहणार आहेत .
या सत्कार समारंभात सहभागी व्हावे असे अवाहन फलटण एज्युकेशन सोसायटी सत्कार समिती कडून करण्यत आले आहे .