डोर्लेवाडी दि. २ (फलटण टुडे ) :
शनिवार दिनांक ३ डिसेंबर २०२२ ईगल स्पोर्टस अकॅडमी डोर्लेवाडी आयोजित माजी कृषीमंत्री भारत सरकार मा. ना. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ६५ किलो वजनी गटाच्या भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन डोर्लेवाडी येथील महात्मा फुले विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या मैदानावर सकाळी ११ वाजता संपन्न होणार असून या स्पर्धेचा उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मा. उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य मा. अजितदादा पवार व माजी राज्यमंत्री मा. दतात्रय भरणे हे असणार आहेत तर या स्पर्धेचे उद्घाटन अध्यक्ष बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस संभाजी नाना होळकर , चेअरमन बारामती सहकारी बँक बारामती सचिन शेठ सातव , संचालकमाळेगाव सहकारी साखर कारखाना संदिप आण्णा जगताप , डोर्लेवाडीचे सरपंच बाळासाहेब सलवदे , उपसरपंच संदिप नाळे , ईगल स्पोर्ट्स अकॅडमी अध्यक्ष सुनिल पागळे व उपाध्यक्षअजित शेठ बनकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे .
यावेळी दशरथ जाधव उद्योजक पुणे , हनुमंत जाधव रेंज फॉरेस्ट ऑफिसर वडगाव मावळ , नामदेव खोत मुंबई पोलीस , संजय जगदाळे पोलीस अधिकारी , जीवन बिराजदार पुणे पोलीस भोसरी स्टेशन पुणे, अनिल सातव तालुका क्रीडा अधिकारी , महेश चावले तालुका क्रीडा अधिकारी , सागर खोत मुंबई पोलीस , संतोष म्हेत्रे उद्योजक डोर्लेवाडी , स्वप्निल शेलार आंतरराष्ट्रीय सिल्वर मेडलिस्ट कुस्ती , विजय काळकुटे निवृत्त मेजर , निलेश काळेबेरे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू , उमेश मोहडे महाराष्ट्र पोलीस , संदीप मोहडे महाराष्ट्र पोलीस , मंगेश बनकर महाराष्ट्र पोलीस , नितीन शेलार महाराष्ट्र पोलीस यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे .
या स्पर्धेचे आयोजन ईगल स्पोर्ट्स अकॅडमी डोर्लेवाडी यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे यासाठी एकूण ६० संघ सहभागी झाले आहेत यामध्ये प्रत्येक संघामध्ये ११ खेळाडू याप्रमाणे एकूण ६६० खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. तसेच प्रत्येक संघाबरोबर एक कोच व एक टीम मॅनेजर असे १२० कोच व टिम मॅनेजर सहभागी होणार आहेत .
या सर्वांची स्पर्धेच्या ठिकाणी आयोजकांकडून योग्य रीतीने सोय करण्यात आलेली आहे प्रेक्षकांना या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी विशेष करून प्रशस्त अशी प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आलेली आहे . ही प्रेक्षक गॅलरी मैदानाच्या तीनह बाजूने उभारण्यात आलेली असून याची प्रेक्षक क्षमता १५०० ते २००० लोकं बसतील एवढी करण्यात आलेली आहे .तसेच भव्य आणि दिव्य असे स्टेज उभारण्यात आले असून यामध्ये प्रमुख पाहुणे ,प्रमुख उपस्थिती व पत्रकार व गुण लेखक यांच्यासाठी विशेष बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच या स्पर्धेसाठी नामांकित पंचांची या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे . या स्पर्धेचे सामने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन च्य नियमानुसार होतील व हे सर्व सामने एकदिवसीय असतील . तसेच लांबून येणाऱ्या संघांसाठी या ठिकाणी नियोजन समितीच्या माध्यमातून त्यांची जेवणाची उत्तम अशी सोय करण्यात आलेली आहे . सर्व सामने क्लब पद्धतीने खेळवले जातील तसेच ज्यांना प्रत्यक्ष हे सामने पाहण्यासाठी येता येऊ शकणार नाही अशा प्रेक्षकांसाठी ईगल स्पोर्ट्सअकॅडमीच्या माध्यमातून सर्व सामने युट्युब वर लाईव्ह दाखवण्यात येतील .
या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या संघास २१००० रुपये रोख व भव्य चषक , द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या संघास १५०००रुपये रोख व भव्य चषक ,तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या संघास १०००० रुपये रोख व भव्य चषक ,चतुर्थ क्रमांक मिळवणाऱ्या संघास ७०००रुपये रोख व भव्य चषक तसेच स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू ,उत्कृष्ट चढाई करणारा खेळाडू उत्कृष्ट पकड करणारा खेळाडू व पब्लिक हिरो या सर्व खेळाडूंसाठी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे .
यावेळी प्रमुख अतिथी साहेबराव दळवी, नारायणराव मोरे , विठ्ठल नवले , स्वप्नील जगताप , तानाजी काटे , राजेंद्र गावडे पाटील , संदीप नाळे , किरण तावरे, प्रवीण माने, अनिल सातव, महेश चावले, अजित जाधव ,विशाल कोकरे, युवराज तावरे, राहुल शितोळे, चांगदेव जाधव, प्रतिभा नेवसे, संभाजी हापसे, विश्वास मांढरे, पप्पू माने, राजेंद्र बोरकर, रोहिणी ताई खडसे – आटोळे, अजित , हेमंतकुमार सोलनकर, श्रीपती जाधव, प्रवीण कर्णे, पद्मनाभ निकम, चंद्रकांत काळे, अर्जुन पागळे , प्रमोद ढवाण पाटील , नितीन साळुंखे ,भाऊसाहेब दिवेकर केदार साळुंखे , सुयश गावडे पाटील , संदीप कुदळे , कार्तिक नाळे , योगेश गडगिळे , शहाजी आवळे , रोहित बनकर , मिलिंद घोरपडे , निखिल देवकाते हे मान्यवर उपस्थित राहणार असून इतरसन्मानी उपस्थितीमध्ये अनेक मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमास लाभणार आहे.
या स्पर्धा यशस्वी पारपाडण्यासाठी ईगल स्पोर्ट्स अकॅडमी डोर्लेवाडी चे पदाधिकारी सुनील पागळे , अजितशेठ बनकर , गणेश खोत , दत्तात्रेय नवले , सचिन दळवी , राहुल जाधव , कल्याण कालगावकर , संदीप नाळे महेश जाधव , अनिल शिवाजी नांदे व ईगाल स्पोट्स च्या इतर सदस्यांनी विशेष मेहनत घेतली आहे .
या स्पर्धेचा आनंद सर्व क्रीडाशौकिनांनी उपस्थित राहून घ्यावा असे आवाहन ईगल स्पोर्ट्स चे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी केले आहे